आयुष्य तेच आहे
आयुष्य तेच आहे, स्वप्न खोटेच आहे
भानावर येताच, वास्तवाचे चटकेच आहे
आयुष्य तेच आहे, मधुर गाणेच आहे
निसर्ग छेडी संगीत, लयबध्द होणेच आहे
आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहेत
एखादं दुसरा सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आहे
आयुष्य तेच आहे, सांगतात सारेच आहे
एक सारखं वाटत नाही, आयुष्य कुठेच आहे
आयुष्य तेच आहे, अधांतरी वाटेच आहे
मृत्यूच एक सत्य, बाकी खोटेच आहे
आयुष्य तेच आहे, सौंदर्यावर भाळलेल आहे
मी मागितला चंद्र, हात पोळलेलेच आहे
आयुष्य तेच आहे, वेडे म्हणणारे खुळेच आहेत
शहाण्यांची ओळख, वेडयांमुळेच आहे
आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहे
मनाला जे पटतं, मेंदूसाठी कोडेच आहे
आयुष्याच्या व्याख्या करताना आपण ज्या
प्रमाणे विचार करतो तसं ते आपल्याला दिसतं आणि तसच ते आपल्या बाबतीत असतं नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा