छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो भारतातील
काही लोकांना १००० व २००० च्या नोटेवर हवेत
पण
एक कवी कवितेतून काय म्हणतो ते पहा……..
“नकोय शिवराय नोटेवर”
नकोय शिवराय नोटेवर
विकला जाईल तो वाटेवर..
आहेत समाजात काही दरिंदे
नाहीत ते कुठलेच परिंदे..
घेऊन जातील शिवराय दारुच्या अड्यावर
लावतील त्यालाही सट्यावर…
म्हणतील शिवराय घ्या अन् दारु द्या..
होतील ते पिऊन तराट
माजवतील कल्लोळ घरात..
नाचणारींवर जाईल पैसा उधळला
नाचता-नाचता तोही जाईल तुडवला..
फोफावला आहे भ्रष्टाचार
नाही उरला शिष्टाचार…
भाटाच्या ताटी जाईल सोपवला
गणींकांच्या हाती जाईल शिवराय सोपवला…
खाटीकांच्या दुकानात जातील घेऊन त्याला
मंदिरात येतील देवासमोर ठेवून त्याला..
नाही विकणा-यांमधला तो, नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो..
राहुद्या तुमचे गांधीच नोटेवर
शिवराय आमचे शोभतात ह्यदयाच्या सिंहासनावर…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा