वाट पाहणारं दार
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं
खरंच सांगतो त्या दारच नाव आई असतं
उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असत
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं
वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं
घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड मर्यादेचं त्याला भान असतं
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं
दारिद्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसत
कोत्या विचारांच्या वाळवीने ते कधी मोडत नसत
ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसत
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं
सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं
लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट काढून देत
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणत
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं
मित्रांनो उभ्या आयुष्यात फक्त एक गोष्ट जपा
उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका
मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका
स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका
ते दार मुलींची,नातींची,बहीणींची, सुनांची
उत्तर द्याहटवा(कमवणाऱ्या),जावयांची ही देखील वाट पहात असतं ?
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाउजेड पडलाय
उत्तर द्याहटवा