शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

मोठं मन

मोठं मन 


पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला,
साधं घर साधी माणसं, कुठे होता बंगला?

घरं जरी साधेच पण, माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी, देवभोळी अन श्रद्धाळू 

सख्खे काय चुलत काय, सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो, आपुलकीने भेटायचे. 

पाहुणा दारात दिसला कि खूप आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून, शीण निघून जायचा हो. 

श्रीमंती जरी नसली तरी,एकटं कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही, कोणाचं काम थांबल नाही. 

उसनं पासन करायचे पण, पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही, मन मोकळं बोलायचे. 

लपाछपी पळापळी, बिन पैश्याचे खेळ हो,
कुणीच कुठे बिझी नव्हते, होता वेळच वेळ हो. 

चिरेबंदी वडे सुद्धा, खळखळून हसायचे,
निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर दिसायचे. 

सुख शांती समाधान ते, आता कुठे दिसत का?
पॉश पॉश घरांमध्ये तशी मैफिल सजते का?

नाते गोते घट्ट होते, किंमत होती माणसाला,
प्रेमामुळे चव होती, अंगणातल्या फणसाला. 
तुम्हीच सांगा नात्यांमध्ये, राहिला आहे का राम ?
मुलीकडे आईचा असतो का मुक्काम?

सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदूंगाच्या तालावरती गाव आता डोलत नाही. 

प्रेम, माया, आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का?
बैठकीतल्या सतरंजीवर, पुन्हा पाहुणे मावतील का?

“नकोय शिवराय नोटेवर” marathi Poem


छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो भारतातील काही लोकांना १००० व २००० च्या नोटेवर हवेत
     पण एक कवी कवितेतून काय म्हणतो ते पहा……..

“नकोय शिवराय नोटेवर”
नकोय शिवराय नोटेवर
विकला जाईल तो वाटेवर..

आहेत समाजात काही दरिंदे
नाहीत ते कुठलेच परिंदे..

घेऊन जातील शिवराय दारुच्या अड्यावर
लावतील त्यालाही सट्यावर…

म्हणतील शिवराय घ्या अन् दारु द्या..

होतील ते पिऊन तराट
माजवतील कल्लोळ घरात..

नाचणारींवर जाईल पैसा उधळला
नाचता-नाचता तोही जाईल तुडवला..

फोफावला आहे भ्रष्टाचार
नाही उरला शिष्टाचार…

भाटाच्या ताटी जाईल सोपवला
गणींकांच्या हाती जाईल शिवराय सोपवला…

खाटीकांच्या दुकानात जातील घेऊन त्याला
मंदिरात येतील देवासमोर ठेवून त्याला..

नाही विकणा-यांमधला तो, नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो..

राहुद्या तुमचे गांधीच नोटेवर
शिवराय आमचे शोभतात ह्यदयाच्या सिंहासनावर…


गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

वाट पाहणारं दार

वाट पाहणारं दार 

प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं 
खरंच सांगतो त्या दारच नाव आई असतं 
उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असत 
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं 

वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं 
घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं 
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड मर्यादेचं त्याला भान असतं 
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं 

दारिद्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसत 
कोत्या विचारांच्या वाळवीने ते कधी मोडत नसत 
ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसत 
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं 

सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं 
लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट काढून देत 
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणत 
प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं 

मित्रांनो उभ्या आयुष्यात फक्त एक गोष्ट जपा 
उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका 
मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका 
स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका 
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका 

तुझे सुरज कहू या चंदा



rq>s lqjt dgWaw ;k pank] rq>s nhi dgWaw ;k rkjk

esjk uke djsxk jks’ku tx esa esjk jkt nqykjk

eSa dc ls rjl jgk Fkk] esjs vkWaxu es dksbZ [ksys
uUgh lh gWalh ds cnys] esjh lkjh nqfu;k y sys
rsjs lax >qy jgk gS esjh ckgksa es tx lkjk

vkt maxyh Fkke dj rsjh] rq>s eSa pyuk fl[kykÅWa
dy gkFk idMuk esjk tc eSa cw<k gks tkÅWa
rw feyk rks eSus ik;k] thus dk u;k lgkjk

esjs ckn Hkh bl nqfu;k esa] ftank esjk uke jgsxk
tks Hkh rq> dks ns[ksxk] rq>s esjk yky dgsxk
rsjs :Ik es fey tk,xk] eq> dks thou nksckjk




हे गाणे ऐकले किंवा वाचले तरी आपल्याला आपल्या आई वडिलांनी कसे आणि काय उमेदीने वाढवले असावे हे कळते पण असे असताना सुद्धा आज अनेक ठिकाणी याच्या विपरीत परिस्थिती पाहायला मिळते आपण ज्यांच्या म्हातारपणात आधार बनाव एवढीच अपेक्षा असणाऱ्या पालकांचं तेवढंही स्वप्न आपण पूर्ण करण्याच्या पात्रतेचे आपण नाही का ? 

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

ccc course ek desh ek course


hindi status


marathi relation


poem sansar


good thought


suresh bhat poem


ganesh


ganesh image


marathi status


poem marathi


status marathi


motivational marathi status


poem marathi


marathi thoughts


thought marathi


marathi status


marathi quotes


nati goti


status marathi


motivational status marathi


marathi status


status marathi


motivational status marathi


drushtikon marathi status


motivational status marathi


good morning status marathi


jivan status


jivan status


good morning status


good morning status


jivan status


vichardhara status


drushtikon status


good morning status


good morning status


jivan status


मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

देव अजून भेटला नाही

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||

मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक
अजुनपर्यंत घावला नाही...||१||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस...
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस...
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||२||

कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली...
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली...
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||

संत गाडगे महाराज