शुक्रवार, २० मार्च, २०२०

आई वडील आले माझ्या वाट्याला

आई वडील आले माझ्या वाट्याला 


बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला 
घराजवळची बाग मिळाली धाकट्याला 
सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला 
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

पंच जमले होते आम्ही वाटणी करताना 
आगीत तेल घालत होते आम्ही भांडताना 
आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना 
त्यांना आनंद होत होता घर दुभंगलेलं  बघताना 
सगळ्यात धन संपत्ती हवी होती मोठ्याला 
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

संपत्ती नावावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई 
आम्हाला कोण सांभाळेल या आशेनं बघत होते बाबा आई 
आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणच सरकला नाही 
मला कळतच नव्हतं माझ्या वाट्याला येईल का काही 
दाग दागिने आईचे दिले पंचांनी धाकट्याला 
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

सगळे खुश झाले बनून करोडपती 
फक्त आई वडील हीच आपली मोठी संपत्ती 
आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळाली सुखशांती 
शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद येईल कमी अंती 
किती नशीबवान मी काहीच नाही माझ्या साठ्याला 
किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला

बुधवार, ११ मार्च, २०२०

आयुष्य तेच आहे


आयुष्य तेच आहे

आयुष्य तेच आहे, स्वप्न खोटेच आहे
भानावर येताच, वास्तवाचे चटकेच आहे
आयुष्य तेच आहे, मधुर गाणेच आहे
निसर्ग छेडी संगीत, लयबध्द होणेच आहे

आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहेत
एखादं दुसरा सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आहे
आयुष्य तेच आहे, सांगतात सारेच आहे
एक सारखं वाटत नाही, आयुष्य कुठेच आहे

आयुष्य तेच आहे, अधांतरी वाटेच आहे
मृत्यूच एक सत्य, बाकी खोटेच आहे
आयुष्य तेच आहे, सौंदर्यावर भाळलेल आहे
मी मागितला चंद्र, हात पोळलेलेच आहे

आयुष्य तेच आहे, वेडे म्हणणारे खुळेच आहेत
शहाण्यांची ओळख, वेडयांमुळेच आहे
आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहे
मनाला जे पटतं, मेंदूसाठी कोडेच आहे




आयुष्याच्या व्याख्या करताना आपण ज्या प्रमाणे विचार करतो तसं ते आपल्याला दिसतं आणि तसच ते आपल्या बाबतीत असतं नाही का?